अकोलाबाजार शाळेत निकृष्ट आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 20:52 IST2017-08-30T20:52:27+5:302017-08-30T20:52:54+5:30

यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार येथील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचे वास्तव जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे यांच्या भेटीत मंगळवारी उघड झाले.

Low food in Akola Bazar school | अकोलाबाजार शाळेत निकृष्ट आहार

अकोलाबाजार शाळेत निकृष्ट आहार

ठळक मुद्देसावळा गोंधळ : जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे यांच्या भेटीतील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोलाबाजार : यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार येथील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचे वास्तव जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे यांच्या भेटीत मंगळवारी उघड झाले. दोन विद्यार्थिनीनी घरून ताट न आणल्याने त्यांना उपोशी राहावे लागल्याचे निदर्शनास आले.
येथील जिल्हा परिषद शाळेला रेणूताई शिंदे यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोषण आहाराचे अवलोकन केले. पोषण आहार ठेऊन असलेल्या खोलीची पाहणी केली. तेथे निकृष्ट दर्जाचा तांदूळ, कुजलेली मोट, डंख मारलेले वाटाणे, धान्याची नासाडी आणि खोलीत अस्वच्छता आढळून आली. खिचडी तयार करण्यासाठी आणलेल्या मसाल्याची मुदतही महिनाभरापूर्वीच संपली होती. परंतु या कालबाह्य समुग्रीवरच पोषण आहार तयार केला जात होता. यात मुख्याध्यापकांसह शिक्षकांचाही निष्काळजीपणा दिसून आला. त्यामुळे त्यांनी याबाबत जाब विचारला. तसेच विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घरून प्लेट आणावी लागते. मंगळवारी हर्षाली शहाकार व काजल जाधव या दोघींनी प्लेट न आणल्याने त्यांनी उपाशी रहावे लागल्याचे यावेळी पुढे आले. विशेष म्हणजे शाळेत ताट असूनही, आम्हाला दिले नसल्याचे या दोघींनी शिंदे यांना सांगितले.
रेणूताई शिंदे यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. त्यांच्याकडून वाचन, पाढे म्हणून घेतले. दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रिजीचे पुस्तक निट वाचता आले नाही. अनेक विद्यार्थी ढ असल्याचे आढळून आले. दोन महिने होऊनही विज्ञान विषय शिकविला नसल्याचे वास्तवही अनुभवले. प्रभारी मुख्याध्यापिका कार्यालयीन कामकाजाचे कारण पुढे करून वारंवार गैरहजर राहात असल्याचे निदर्शनास आले. मंगळवारीही अर्ज न देता त्या गैरहजर होत्या. पोषण आहार आणि शैक्षणिक बाबतीत सुधारणा करण्याची सूचना रेणूताई शिंदे यांनी शिक्षकांना दिली.
 

Web Title: Low food in Akola Bazar school