क्रीडा कार्यालयाचा शिबिरांना खो

By Admin | Updated: May 1, 2016 02:27 IST2016-05-01T02:27:08+5:302016-05-01T02:27:08+5:30

शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित करण्यासाठी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

Lose to the sports office camps | क्रीडा कार्यालयाचा शिबिरांना खो

क्रीडा कार्यालयाचा शिबिरांना खो

अनास्था : उन्हाळी शिबिराच्या निधीचा कागदोपत्री विनियोग
नीलेश भगत यवतमाळ
शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित करण्यासाठी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा या कार्यालयाला उन्हाळी शिबिर आयोजनाचा चक्क विसर पडल्याचे दिसत आहे. उन्हाळा संपत आला तरी अद्याप कोणत्याही क्रीडा प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला नाही.
उन्हाळ्याच्या सुट्यांचा सदुपयोग व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, मैदानी खेळातून आरोग्य सुदृढ व्हावे, हा या मागचा उद्देश असतो. दरवर्षी उन्हाळ्यात येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विविध खेळांचे शिबिर घेत असते. यात फूटबॉल, बास्केट बॉल, हॅन्डबॉल, स्केटींग, तायक्वाँदो, कराटे आदी क्रीडा प्रकारांचा यात समावेश असतो. परंतु यंदा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनास्थेने या शिबिराला सुरुवात झाली नाही. उलट याच नेहरू स्टेडियममध्ये खासगी संघटना विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर राबवित आहे. त्याला खेळाडूंची मोठी गर्दीही असते. या खासगी शिबिरासाठी पालकांना मोठी रक्कम मोजावी लागते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने शिबिर आयोजित केल्यास अत्यल्प दरात विविध खेळांचे प्रशिक्षण मिळू शकते. यंदा अनेक विद्यार्थी क्रीडा मार्गदर्शनापासून वंचित राहात आहेत.
विशेष म्हणजे या शिबिरांसाठी शासनाच्यावतीने निधीही दिला जातो. परंतु येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील काही मंडळी हा निधी हडपण्यासाठी केवळ कागदोपत्री शिबिर आयोजित करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यातच गेल्या ३२ महिन्यांपासून यवतमाळला पूर्णवेळ जिल्हा क्रीडा अधिकारी नाही. त्यातूनच क्रीडा प्रशिक्षणाला बुट्टी दिल्याची बाब पुढे आली आहे.

Web Title: Lose to the sports office camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.