‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धा उत्साहात
By Admin | Updated: December 14, 2015 02:38 IST2015-12-14T02:38:02+5:302015-12-14T02:38:02+5:30
लोकमत बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटच्यावतीने आयोजित ‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धा उत्साहात
४५० विद्यार्थ्यांचा सहभाग : बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटचा उपक्रम
यवतमाळ : लोकमत बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटच्यावतीने आयोजित ‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या या परीक्षेत तब्बल ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित या स्पर्धेत आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर गर्दी दिसत होती. स्टेट बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.
या परीक्षेसाठी अॅग्लो हिंदी विद्यालयाचे शिक्षक आनंदकुमार उपाध्याय, कृष्णकुमार त्रिपाठी, हरिहर सिंह, सुरेंद्र त्रिपाठी आणि दीपिका पुट्टेवार, सीमा अंभोरे, ओंकार महल्ले, सरला अंबुलकर, रंगारी यांनी पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लवकरच या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
(उपक्रम प्रतिनिधी)