शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट: जिजाबाईंच्या सुराला मिळाली साथ; हरसुलची आजी होणार आता सिनेमाची गायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:56 IST

होय, मागच्या आठवड्यात तुम्ही ज्या गोड गळ्याच्या आजीची बातमी वाचली, तिच्याच यशाची ही पुढची गोष्ट आहे.

अविनाश साबापुरे

यवतमाळ : गावच्या मातीत अख्खे आयुष्य मुक्त गाणारी एक निरक्षर मुलगी आज सत्तर वर्षांची आजी झाली. तिच्या गाण्यात कोकीळेचा गोडवा असला तरी आजवर तिला मंच मिळाला नाही. ‘लोकमत’ने तिची उपेक्षित सूरमयी जिंदगी समाजापुढे आणल्यावर सिनेदिग्दर्शक सरसावले आहेत. हरसुल नावाच्या छोट्याशा खेड्यातच मिसळून मर्यादित राहिलेले तिचे सूर आता लवकरच सिनेगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राला तृप्त करणार आहेत. 

होय, मागच्या आठवड्यात तुम्ही ज्या गोड गळ्याच्या आजीची बातमी वाचली, तिच्याच यशाची ही पुढची गोष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हरसूल (ता. दिग्रस) या छोट्याशा खेड्यात जिजाबाई भगत या अस्सल गावरान मावशीची गोष्ट आहे. रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या जिजाबाईच्या कंठात जन्मजात गाणे आहे. तिचे गाणे ऐकताना गावकऱ्यांना वाटते जणू लता मंगेशकरांचेच गाणे ऐकतोय! पण या गानकोकीळेच्या नशिबी सत्तर वर्षांचे आयुष्य लोटूनही कधीच प्रसिद्धीचे चार क्षण आले नाही. शेवटी ‘लोकमत’ने १८ ऑगस्ट रोजी ‘सत्तरीच्या संघर्षात मुरलेला सदाबहार स्वर’ या मथळ्याखाली ही उपेक्षित प्रतिभा जगासमोर आणली. अन् जगाचे डोळे विस्फारले. 

बातमी वाचा -  वावरात मजुरी, घरात गरिबी, अंगात आजार तरी 'तिच्या' गळ्यात गोडवा

‘लोकमत’ची बातमी वाचून मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत मानकर यांनी आपल्या आगामी चित्रपटात जिजाबाईकडून एक गाणे गाऊन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी लवकरच ते हरसूल गावातही भेट देणार आहेत. तर दुसरीकडे जिजाबाईंच्या उतारवयात मदत करण्यासाठी अनेकांनी हात पुढे केला आहे. पुसद, बुलडाणा, अकोलासारख्या गावातून विविध मंडळांनी जिजाबाईच्या गाण्याचे कार्यक्रम करण्याचे निमंत्रण देऊ केले आहे. 

बालपणापासून सुरांची साधना करता-करता अन् घरातल्या गरिबीशी लढता-लढता जिजाबाईने लग्नच केले नाही. आज वृद्धत्वाचे दिवस भोगतानाही ती एकटीच असते. एका हात पूर्णत: निकामी झालेला आहे, तरीही जिजाबाई शेतमजुरी करते. धुणीभांडी करून गुजराण करते. अखेर ‘लोकमत’मधून जिजाबाईचे गाणे कळल्यावर दिग्रसच्या प्रशासनाने त्यांना वृद्ध कलावंत योजनेतून नियमित मानधन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातही जिजाबाईला मान मिळू लागला आहे. लवकरच त्यांचे गाणे सिनेमात येणार आहे. शेवटी शेवटी रंग भरला जरा, जीवनाशी आता सूर जुळला खरा, सुरेश भटांच्या या गझलेसारखेच जिजाबाईंचे उपेक्षित आयुष्य शेवटच्या काळात सुखाकडे झेपावले आहे.

माझा ‘जिव्हार’ नावाचा सिनेमा लवकरच येऊ घातला आहे. त्यातल्या ९ पैकी एक गाणे मी जिजाबाईंकडून गाऊन घेणार आहे. उर्वरित गाणी साधना सरगम, शान, उदीत नारायण यांच्या स्वरात येणार आहेत. जिव्हार म्हणजे अंतर्मनातून येणारी हाक. जिजाबाईंसारख्या कलावंतांना गॉडफादर मिळत नाही. त्यांची प्रतिभा गावातच मर्यादित राहते. पण जिजाबाईंच्या बाबतीत असे होणार नाही. - प्रशांत मानकर, सिने दिग्दर्शक, मुंबई

तुमची सर्वायची साथ असन तं मी सिनेमात गाणं म्हणाले तयार हावो बाप्पा. मले पयलंपासूनच शौक हाये गाण्याचा. पण मी हाये अडाणी. मायासारखीले सिनेमात गाणं म्हणाले भेटनं हे तं लई मोठी गोष्ट हाये.  - जिजाबाई भगत, वृद्ध गायिका, हरसूल

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्टcinemaसिनेमाYavatmalयवतमाळ