शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

लोकमत दीपोत्सव ज्ञानाचा प्रकाश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवते

By admin | Updated: November 7, 2015 02:32 IST

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दीपांचा प्रकाश या पर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. तसाच ज्ञानाचा प्रकाश दीपोत्सवाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत ....

राजेश खवले : लोकमत दीपोत्सवाचे शानदार प्रकाशन यवतमाळ : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दीपांचा प्रकाश या पर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. तसाच ज्ञानाचा प्रकाश दीपोत्सवाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. यवतमाळ लोकमत जिल्हा कार्यालयात गुरुवारी आयोजित लोकमत दीपोत्सव प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सीए प्रकाश चोपडा, कवी मन्सूर एजाज जोश, उद्घोषिका मंगला माळवे उपस्थित होते. यवतमाळातील साहित्यिक आणि कवींच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात दीपोत्सवाबद्दल मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. राजेश खवले म्हणाले, दीपोत्सव हा ज्ञानवर्धक अंंक आहे. त्याने एक लाखांंचा उच्चांक पार केला आहे. अशा या प्रकाशन सोहळ्याला येणे माझे भाग्य समजतो. हा लखपती अंक असून तो करोडोपती व्हावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या प्रास्ताविकात लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा म्हणाले, लोकांच्या विचारांना चालना देणारा हा दीपोत्सव आहे. देशात घडलेल्या घटनांचे चलचित्र या दीपोत्सवात रेखाटले असून दीपोत्सवाचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी सांगितला. उर्दू कवी मन्सूर एजाज जोश म्हणाले, साहित्य आत्म्याचे खाद्य आहे. साहित्यातून ज्ञानाची तहान भागते. दिवाळी अंकाचा एक भाग होण्याचे भाग्य मलाही काही वर्षापूर्वी लाभले होते. ‘लोकमत’ माणसाला माणूस बनविण्याचे शिक्षण देतो, असे ते म्हणाले. मंगला माळवे यांंनी ‘लोकमत’ दिवाळी अंकाचे त्यांच्याशी असलेले घट्ट नाते उलगडून दाखविले. सातव्या वर्गात असल्यापासून ‘लोकमत’चा दिवाळी अंक वाचत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश नेणारा हा दीपोत्सव असल्याचे त्यांंनी सांगितले. सीए प्रकाश चोपडा यांनी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांचा मराठवाड्यातील एका गावातील अनुभव सांगितला. एका गावात राजेंद्र दर्डा यांनी एका व्यक्तीला तुमच्या घरी कोण कोण राहते, असे विचारले. तेव्हा त्या व्यक्तीने मी, माझी पत्नी, माझा मुलगा आणि माझा लोकमत असे सांगितले. ‘लोकमत’हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा कसा सदस्य झाला हे यातून दिसून येते. प्रत्येकाने वाचावा असा अंक असल्याचे चोपडा म्हणाले. कार्यक्रमाला प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, कवी हेमंत कांबळे, साहित्यिक योगानंद टेभूर्णे, संजय शिंदे पाटील, मोहन गांधी, नरेश लुणावत, सुभाष जैन, अशोक जैन यांच्यासह लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते. संचालन काशीनाथ लाहोरे यांंनी तर आभार लोकमत टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी रणजितसिंह चंदेल यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)