‘लोकमत’चे रुपेश उत्तरवार यांना पत्रकारिता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:55 IST2018-02-26T20:55:59+5:302018-02-26T20:55:59+5:30
वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी रूपेश उत्तरवार आणि वृत्तवाहिनी क्षेत्रातील कार्याबद्दल ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी कपिल श्यामकुंवर यांना तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘लोकमत’चे रुपेश उत्तरवार यांना पत्रकारिता पुरस्कार
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी रूपेश उत्तरवार आणि वृत्तवाहिनी क्षेत्रातील कार्याबद्दल ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी कपिल श्यामकुंवर यांना तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवछत्रपती महोत्सव समितीतर्फे देशाच्या पहिल्या महिला संपादक तानुबाई बिर्जे यांच्या नावाने दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. येथील समता मैदानावर शिवजयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तानुबाई बिर्जे स्मृतिचिन्ह, शिवचरित्राचे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कृषीविषयक घडामोडींच्या संदर्भात सातत्याने आणि सखोल लेखन ही रुपेश उत्तरवार यांची ओळख आहे. सावर्जनिक शिवजयंती महोत्सवात या कार्याची दखल घेण्यात आली.