सात तासात हाती येणार निकाल लोकसभा निवडणूक

By Admin | Updated: May 11, 2014 00:38 IST2014-05-11T00:38:10+5:302014-05-11T00:38:10+5:30

यवतमाळ : यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली आहे.

Lok Sabha elections will be held in seven hours | सात तासात हाती येणार निकाल लोकसभा निवडणूक

सात तासात हाती येणार निकाल लोकसभा निवडणूक

मतमोजणीसाठी ५०० कर्मचारी नियुक्त

यवतमाळ : यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली आहे. सुमारे ५०० कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहे. अवघ्या सात तासात अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे. दारव्हा मार्गावरील पुरवठा विभागाच्या धान्य गोदामात मतमोजणी होणार असून, त्याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी १० एप्रिल रोजी मतदान पार पडले. एकूण २६ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या १६ मे रोजी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून काही सूचना केल्या आहेत. सोबतच मतमोजणीचे प्रशिक्षणही कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. मतमोजणीत कुठलाही गोंधळ होऊ नये, म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. निकाल जाहीर होईपर्यंत दारव्हा मार्गावरील सर्व वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यासाठी रिंगरोडचा वापर केला जाणार आहे. अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. याशिवाय राज्य राखीव दलाची तुकडी राहणार आहे. सहा विधानसभा क्षेत्राचा निकाल विविध फेर्‍यांमध्ये क्रमाक्रमाने जाहीर केला जाणार आहे. एका मतदारसंघासाठी १४ टेबल लावण्यात येणार आहे. त्यातील तीन टेबल पोस्टल बॅलेटसाठी असणार आहे. सात मिनिटांची एक फेरी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सहाही विधानसभा मतदारसंघात २१ ते २८ फेर्‍या होणार आहे. एक फेरी सात मिनीट १३ सेकंदाची राहणार आहे. फेरीनिहाय निकाल ध्वनिक्षेपकावरून जाहीर केला जाईल. यासोबतच डिस्प्ले बोर्ड आणि वायफाय या साधणांचाही निकाल जाहीर करण्यासाठी वापर केला जाणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच प्रारंभी बॅलेट पेपरची मतं मोजली जातील. त्यानंतर क्रमश: मशीनवरील मतांची मोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुपारचे ३ वाजतील. (शहर वार्ताहर)

Web Title: Lok Sabha elections will be held in seven hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.