शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सरासरी ६२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 7:36 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी सरासरी ६२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली.

ठळक मुद्देसायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ टक्के भावना गवळी, माणिकराव ठाकरेंसह २४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी सरासरी ६२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. त्यात आणखी आठ ते नऊ टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. काही केंद्रांवर ईव्हीएम बिघडण्याच्या व त्यामुळे मतदारांना ताटकळत रहावे लागण्याचे प्रकार घडले. खासदारकीची चौथी टर्म पूर्ण करून पाचव्यांदा रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह २४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले.सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.९७ टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. तर मतदानाची अंतिम टक्केवारी ६२ टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकंदर १९ लाख १४ हजार ८०५ मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा खासदार या मतदारसंघातून निवडून जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी २२०६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. विशेष म्हणजे, उन्हाचा तडाखा प्रचंड असतानाही मतदारांनी मताधिकार बजाण्यासाठी उत्साह दाखविला. भर उन्हातही मतदानाची टक्केवारी वाढताना पाहायला मिळाली.सकाळी पहिल्या दोन तासात केवळ ५.०३ टक्के मतदान झाले. तर नंतरच्या दोन तासात सकाळी ११ वाजेपर्यंत १२.०६ टक्के मतदान नोंदविले गेले. मात्र एकीकडे उन्ह वाढत असताना दुसरीकडे मतदानाचीही टक्के वाढत गेली. दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघात २६.०९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तर दुपारी ३ पर्यंत ही टक्केवारी वाढून ४३.४२ पर्यंत पोहोचली. यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी विविध कामे बाजूला सारुन मतदानासाठी धाव घेतली. राळेगाव तालुक्यातील अरुण केवटे नामक तरुणाने स्वत:चे लग्न असतानाही आधी मतदान नंतर लग्न असा निर्णय घेतला. वयोवृद्ध, अपंगांनीही शारीरिक अडचणींवर मात करीत मतदान केंद्रांपर्यंत धाव घेतली. दिवसभर मतदान केंद्रांवर उत्साह पहायला मिळाला. सायंकाळी ६ वाजताही मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा कायम होत्या. अनेक केंद्रांवर ६ नंतरही मतदानाची मूभा द्यावी लागली. कळंब तालुक्यातील वेणी कोठा येथे सायंकाळी ईव्हीएम बिघडल्याने मतदारांना वेळ संपल्यानंतर तासभर मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. नेर तालुक्यातील आजंतीच्या नागरिकांनी पाणीटंचाईच्या मुद्यावर मतदानावर बहिष्कार घातला. तेथे बहुतांश मतदारांनी पाठ फिरविल्याने केंद्रावर शुकशुकाट होता.विजय दर्डांनी बजावला हक्कलोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी यवतमाळ येथील काटेबाई शाळा मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजय दर्डा म्हणाले, संविधानाने आपणाला मतदानाचा अधिकार दिला असून तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019