शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्राँग रूममधील ईव्हीएम हॅक होण्याची काँग्रेसला भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:23 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

यवतमाळ -  लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मात्र तेथून मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

ईव्हीएम हॅक होऊ नये म्हणून स्ट्राँग रुम परिसरात जामर लावण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आली आहे. हे ईव्हीएम मोबाईल संपर्कात येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. सुमारे दीड महिना अर्थात २३ मेपर्यंत ईव्हीएम या स्ट्राँग रुममध्ये राहणार असल्याने तेथे जामरसह विविध उपाय योजना कराव्या, ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनातून केली आहे.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला गुरुवारी (11 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले आहे. या मतदानला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश होता. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस