विविधतेत जीवन व्यतीत करणे भारतीयांचे खास वैशिष्ट्य

By Admin | Updated: June 20, 2017 01:19 IST2017-06-20T01:19:35+5:302017-06-20T01:19:35+5:30

विविधता आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात यामध्ये वेगळेपण असताना मानवतेच्या आणि आपण भारतीय आहोत

Living specialties in diversity is a special feature of India | विविधतेत जीवन व्यतीत करणे भारतीयांचे खास वैशिष्ट्य

विविधतेत जीवन व्यतीत करणे भारतीयांचे खास वैशिष्ट्य

लाईक अहेमद : स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनची इफ्तार पार्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : विविधता आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात यामध्ये वेगळेपण असताना मानवतेच्या आणि आपण भारतीय आहोत या भावनेने येथे एकदुसऱ्यांची मने जुळलेली आहेत. भारतीय समाज हजारो वर्षांपासून विविधतेमध्ये जगण्याची पद्धत जाणतो, असे प्रतिपादन एसआयओ विद्यार्थी संघटनेचे केंद्रीय सदस्य लाईक अहेमद खान (हैदराबाद) यांनी येथे केले.
स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजन इफ्तार पार्टीत ‘सांप्रदायिक सद्भाव आणि राष्ट्र निर्माण’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नामदेव ससाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, नगरपरिषद उपाध्यक्ष अरविंद भोयर, भाजपा शहराध्यक्ष महेश काळेश्वरकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, फिरोज अन्सारी, एसआयओचे अध्यक्ष शोएब इक्बाल उपस्थित होते.
लाईक अहेमद म्हणाले, भारतीय संविधान जगातील सर्वात उत्तम संविधान आहे. राज्यघटनेने सर्व धर्म व संप्रदायांना मानणाऱ्या लोकांना धार्मिक स्वातंत्र दिले. सर्व जातीधर्मा दरम्यान बंधुत्व, शांती, सुरक्षा हे संविधानाचे मुळ आहे. त्यामुळे देश संविधानानेचे पुढे गेला पाहिेजे, असे ते म्हणाले. भारत धार्मिक लोकांचा देश आहे. येथी सर्व धर्माचे लोक आपली ओळख, संस्कृती अबाधित ठेऊन जीवन जगू इच्छितात हीच भारतीय लोकशाही असल्याचे त्यांनी सांगितले.
रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले. कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी नितीमत्ता व उच्च चरित्र्य आवश्यक आहे. त्याकरिता उपवास आहेत. उपसासात मनुष्य वाईट बाबींपासून व कामापासून वाचतो. कुरआनचे मार्गदर्शन प्राप्त करून त्यावर आचरण करण्यासाठी रोजे-उपवास हे प्रशिक्षण आहे. यामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पैगंबरांनी अरबस्थानात मनुष्य अल्लाह-ईश्वराच्या सदैव दृष्टिक्षेपात आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरूवात इरफान खान यांच्या कुरआन पठणाने झाली. प्रास्ताविक शोएब खान यांनी तर आभार काझी मलीक यांनी मानले.

Web Title: Living specialties in diversity is a special feature of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.