शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विहिरीत पडलेल्या माकडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:29 PM

पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या २२ माकडांना जीवदान देण्यात ग्रामस्थ व वनविभागाच्या पथकाला यश आले. तालुक्याच्या जवळगाव येथे रविवारी दोरीच्या जाळीने माकडांना वाचविण्यात आले.

ठळक मुद्देजवळगाव : ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या २२ माकडांना जीवदान देण्यात ग्रामस्थ व वनविभागाच्या पथकाला यश आले. तालुक्याच्या जवळगाव येथे रविवारी दोरीच्या जाळीने माकडांना वाचविण्यात आले.जंगलात पाणी नाही, वन्य जीवांची गावाकडे धाव सुरू आहे. पाण्याच्या शोधात माकडाचा कळप जवळगाव शिवारात शिरला. शिवराज गुघाणे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक-दोन नव्हे तर तब्बल २२ माकडं एकामागून एक कोसळली. त्यांची जिवाच्या आकांताने धडपड सुरू होती.शेतात गेलेल्या शिवराज गुघाणे यांनी विहिरीत माकडं पडल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. तेथूनच या माकडांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड यांना माहिती दिली. त्यांच्यासह आरती उके, आर.एम. लढी, सविता भडके हे वनअधिकारी व कर्मचारी विनाविलंब जवळगावात दाखल झाले. माकडांना बाहेर काढण्यासाठी दोरीची जाळी विहिरीत टाकली. त्याआधारे सर्व २२ माकडांना वाचविण्यात यश आले.पाण्याच्या शोधात जवळगाव शिवारात मागील आठ दिवसात जवळपास १५० माकडं विहिरीत पडली. या गावातील बाबाराव चिपडे हे व्यक्ती रोज दोरीची जाळी घेऊन निघतो आणि माकडांचे प्राण वाचवितो. शिवराज गुघाणे, बाबाराव चिपडे, महादेव गुघाणे यांच्याच विहिरीला पाणी आहे. रविवारी या शिवारात असलेल्या विहिरींमध्ये २८ माकडं पडली होती.