दारू व्यावसायिकाला सव्वा लाखाने लुटले

By Admin | Updated: September 3, 2014 00:04 IST2014-09-03T00:04:22+5:302014-09-03T00:04:22+5:30

दारू व्यावसायिकाचे बोलेरो वाहन अडवून सशस्त्र टोळक्याने १ लाख २९ हजार रुपये लुटले. ही घटना तालुक्यातील फुलसावंगीलगत सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी

The liquor merchant robbed millions of people | दारू व्यावसायिकाला सव्वा लाखाने लुटले

दारू व्यावसायिकाला सव्वा लाखाने लुटले

महागाव : दारू व्यावसायिकाचे बोलेरो वाहन अडवून सशस्त्र टोळक्याने १ लाख २९ हजार रुपये लुटले. ही घटना तालुक्यातील फुलसावंगीलगत सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी धनोडा येथील लुटमारीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ही घटना घडली. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दारू व्यावसायिक वनप्रकाश गणपतराव साने (६०) रा. अहल्या रेसीडन्सी यवतमाळ आणि वाहन चालक रमेश खत्री रा. यवतमाळ हे नेहमीप्रमाणे तालुक्यातील दुकानात दारूची आॅर्डर घेण्यासाठी आले होते. बोलेरो गाडीने (एम.एच.२९-टी-४३४४) ते फुलसावंगी येथून महागावकडे निघाले. फुलसावंगीलगत चार ते पाच युवकांनी दारू पिल्याचे सोंग करून वाहन थांबविले आणि शस्त्राचा धाक दाखवून वाहनाचा ताबा घेतला. वाहनात बसून हे चारही युवक महागावच्या दिशेने निघाले. दरम्यान चिल्ली फाट्यावरून वाहन दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आले. वाहन चालक खत्री आणि साने यांच्या हाताला आणि गळ्याला दोरी आवळण्यात आली. साने यांच्या हाताला चाकूचा मार लागला तर गळ्याला दोरी आवळल्याची खूण पडली. चिल्ली मार्गावर झालेल्या झटपटीत साने यांच्याजवळील एक लाख २९ हजार रुपये असलेली बॅग घेऊन लुटारू पसार झाले. त्यानंतर जखमींनी महागाव पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी २५ ते २८ वयोगटातील होते. ते आपसात विशिष्ट भाषा बोलत असल्याचे फिर्यादीने सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान ठाणेदार अरुण आगे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपी लोकलच असल्याचा अंदाज असून सायंकाळपर्यंत त्यांना अटक करण्यात येईल, असे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन महागाव येथे दाखल झाले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The liquor merchant robbed millions of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.