नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना होणार रद्द

By Admin | Updated: July 8, 2015 00:07 IST2015-07-08T00:07:03+5:302015-07-08T00:07:03+5:30

जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासोबतच परवानाधारक विक्रेत्यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

Licensing of those who violate the rules will be canceled | नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना होणार रद्द

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना होणार रद्द

अवैध दारू विक्रीवर बंदी : परवानाधारक दारू दुकानांवर वॉच
यवतमाळ : जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासोबतच परवानाधारक विक्रेत्यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने नियमांचे पालन करत नसतील अशी दुकाने तातडीने निलंबित करा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
पालकमंत्र्यांनी महसूल भवन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागासह जलयुक्त शिवार, पीक कर्ज वाटप आदींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात दारुबंदीने जोर पकडला आहे. बंदीबाबतचा निर्णय हा शासनस्तरावरचा आहे. असे असले तरी प्रशासन या बाबतीत संवेदनशील असल्याचे दिसले पाहिजे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अवैध मद्यविक्री होता कामा नये. परवानाधारक दुकाने नियमांचे पालन करीत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. मद्यविक्रीबाबत दुकानांकडून वेळेचे पालन होत नाही. अनेक ठिकाणी काही विक्रेते सकाळपासून मद्यविक्रीस प्रारंभ करतात. रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री चालत असल्याचे वारंवार आढळून आले आहे. शासनाच्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. असे पालन होत नसल्यास दुकाने निलंबित करा. गरज पडल्यास कायमस्वरूपी परवाने रद्द विशिष्ठ विक्रेते मद्याच्या पेट्या ग्रामीण भागात नेवून तेथे विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहे. अशा दुकानांवर लक्ष ठेवून कार्यवाही केली जावी. उत्पादन शुल्क विभागाने आठवड्यात याबाबत केसेस करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सुचना पालकमंत्र्यांनी केली. दुकानदारांनी स्वत:हुन सीसीटीव्ही लावल्यास त्यांच्याही सोईचे होणार असल्याने यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा घेतला. या योजनेतील कामे गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व कामांची पाहणी व गुणवत्ता तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Licensing of those who violate the rules will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.