एलआयसी एजंटचा एसटी अपघातात मृत्यू
By Admin | Updated: June 26, 2016 02:29 IST2016-06-26T02:29:33+5:302016-06-26T02:29:33+5:30
भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार एलआयसी एजंट जागीच ठार झाल्याची घटना स्थानिक बसस्थानक

एलआयसी एजंटचा एसटी अपघातात मृत्यू
दुचाकीला धडक : बसस्थानक चौकातील घटना
यवतमाळ : भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार एलआयसी एजंट जागीच ठार झाल्याची घटना स्थानिक बसस्थानक चौकात शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. निखिल देवराव रादे (२७) रा.डोंगरखर्डा असे मृताचे नाव आहे.
निखिल हा मोटरसायकलने (एम.एच.२९/ए.डी.-७१८) आर्णी मार्गावरून गार्डन रोडकडे जात असताना अमरावतीकडे जाणाऱ्या एसटीने (एम.एच.४०/वाय-५३११) धडक दिली. निखिलची दुचाकी आदळली. सिग्नल सुटल्यानंतर अमरावतीला जाण्यासाठी ही बस निघाली होती. अचानक दुचाकी धडकल्याने ब्रेक करेपर्यंतच दुचाकी व त्यावरील स्वार बसखाली चिरडल्या गेला. निखिलला गंभीर अवस्थेत नागरिकांनी तातडीने शसकीय रुग्णालयात दाखल केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
निखिल हा एलआयसी एजंट म्हणून काम करत होता. यवतमाळातील लक्ष्मीनगरमध्ये मामा शशिकांत आखरे यांच्याकडे राहात होता. एलआयसीच्या कामानिमित्त तो घराबाहेर पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी निखिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
यवतमाळ येथील बसस्थानक चौकात सिग्नल आहेत. मात्र मार्ग मोकळा झाल्याबद्दलचा सिग्नल मिळण्यापूर्वीच वाहने हाकण्याची जणू स्पर्धाच याठिकाणी लागते. इतर भागाकडील वाहने पूर्णपणे निघण्यापूर्वीच दुसरीकडील वाहनांचा वेग वाढतो. याप्रकारातच लहानमोठे अपघात याठिकाणी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)