ग्रंथपालासह दोघे एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: November 24, 2014 23:06 IST2014-11-24T23:06:49+5:302014-11-24T23:06:49+5:30
आर्णी येथील सामकी माता सार्वजनिक ग्रंथालयास शासकीय योजनेतून साहित्य पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रंथालयाच्या संचालकाने केलेल्या तक्रारीवरून

ग्रंथपालासह दोघे एसीबीच्या जाळ्यात
यवतमाळ : आर्णी येथील सामकी माता सार्वजनिक ग्रंथालयास शासकीय योजनेतून साहित्य पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रंथालयाच्या संचालकाने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यात जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यासह त्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी दुपारी आर्णी येथे करण्यात आली.
शासकीय योजनेतून वितरित करण्यात आलेल्या साहित्याच्या मंजुरीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद वासुदेवराव रामशेट्टीवार यांनी ३०० रुपयाच्या लाचेची मागणी केली. यासाठी त्यांनी किशोर सीताराम राठोड या खासगी व्यक्तीची मदत घेतली. ग्रंथपाल अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार सामकी माता सार्वजनिक ग्रंथालय आर्णी यांच्याकडून करण्यात आली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, अमोल महल्ले, नीलेश पखाले, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांंनी सापळा रचला. यात किशोर राठोड हा ३०० रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. या प्रकरणात प्रमोद रामशेट्टीवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)