जिल्हा परिषदेतील लेटलतिफांना चाप
By Admin | Updated: June 30, 2016 02:29 IST2016-06-30T02:29:21+5:302016-06-30T02:29:21+5:30
वेळी अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने फेस रिडरसह थम्ब मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेतील लेटलतिफांना चाप
नवा लूक : फेस रिडर आणि थम्ब सिस्टीम
यवतमाळ : वेळी अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने फेस रिडरसह थम्ब मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ड्रेस कोडची सक्ती केली जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा नवा लूक पहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी शिस्तीसाठी काही निर्णय घेतले आहेत. अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाला थम्ब सिस्टम बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची पहिली अंमलबजावनी सामान्य प्रशासन विभागात करण्यात येणार आहे. तसेच अद्यावत फेस रिडर मशिनचा लावली जाणार आहे. यामुळे हा कर्मचारी कधी आला आणि परतला याची माहिती मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पगार कपात केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरूण मोहड यांनी स्पष्ट केले. (शहर वार्ताहर)
ड्रेस कोडची सक्ती
जिल्हा परिषदेमध्ये १० जुलैपासून कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्ती केली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना एकाच गणवेश राहणार आहे.त्याकरीता सोमवार आणि शुक्रवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी पुरूष निळसर पांढऱ्या रेषाचे शर्ट आणि काळा पँट वापरतील. तर महिलांसाठी करड्या रंगाची साडी निश्चित करण्यात आली आहे.