माना जमातीला जात प्रमाणपत्र द्या

By Admin | Updated: July 18, 2015 02:24 IST2015-07-18T02:24:48+5:302015-07-18T02:24:48+5:30

माना जमातीला वेठीस धरणारी, जात प्रमाणपत्र तपासणी समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आदिवासी माना जमात मंडळाने

Let the caste caste certificate be considered | माना जमातीला जात प्रमाणपत्र द्या

माना जमातीला जात प्रमाणपत्र द्या

समाजबांधवांचे आंदोलन : आदिवासी माना जमात मंडळाचे धरणे
यवतमाळ : माना जमातीला वेठीस धरणारी, जात प्रमाणपत्र तपासणी समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आदिवासी माना जमात मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे दिले. यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
माना जमातीला ५० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत १८ व्या नंबरवर माना जमातीचे नाव आहे. यानंतरही माना जमातीला जात प्रमाणपत्र दिले जात नाही. यासाठी या समितीची सिबीआय चौकशी करण्यात यावी. समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात यावी. महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश धस यांनी शासनास सादर केलेल्या मुद्यावर अंमलबजावनी व्हावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
यावेळी आदिवासी माना जमात मंडळाचे अध्यक्ष आ.भि.चौके, उपाध्यक्ष र.मो. नारनवरे, सचिव ना.ह. रांदई, कार्याध्यक्ष मो.बा. ढोणे, कोषाध्यक्ष ग.रा. जांभोळे यांच्यासह अनेकजन यावेळी उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)

Web Title: Let the caste caste certificate be considered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.