विद्यार्थिनीने शिकविला चिडीमाराला धडा

By Admin | Updated: August 5, 2015 00:19 IST2015-08-05T00:19:12+5:302015-08-05T00:19:12+5:30

शहरातील शिवनेरी चौकात चिडीमारीचा प्रकार वाढल्याने विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक त्रस्त आहे.

Lessons taught by the student chimimara lessons | विद्यार्थिनीने शिकविला चिडीमाराला धडा

विद्यार्थिनीने शिकविला चिडीमाराला धडा

आर्णीतील घटना : टवाळखोर तरुण दुचाकी सोडून पळाला
आर्णी : शहरातील शिवनेरी चौकात चिडीमारीचा प्रकार वाढल्याने विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक त्रस्त आहे.
सोमवारी मात्र एका शाळकरी विद्यार्थिनीने टवाळखोर तरुणाला चांगलाच धडा शिकविला. शेवटी या तरुणाला आपली दुचाकी सोडून पळ काढावा लागला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही शाळकरी मुलगी कॉम्प्युटर क्लास करून घरी परत निघाली होती. एका टवाळखोर तरुणाने तिला भररस्त्यात अडविले. तिने मोठ्या हिमतीने या तरुणाला आपण रस्त्यावर बोलण्यापेक्षा घरी बसून निवांत बोलू, असे सांगितले. तरुणाला लगेच पुढे काही तरी गंभीर होणार, याची जाणिव झाली व तो तुला पाहून घेतो म्हणत दुचाकीने निघून गेला. मुलीने लगेच वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलगी व तिचे वडील त्या तरुणाचा शोध घेत शिवनेरी चौकात आले. तो तरुण उभाच होता. मात्र मुलीने आपल्या वडिलांना आणल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता तो टवाळखोर तरुण दुचाकी जागीच सोडून पळून गेला. या घटनेमुळे आजूबाजूला उभे असलेले टवाळखोर तरुणही पळाले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर टवाळखोराची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. मुलीने रितसर तक्रार दाखल केली. मात्र टवाळखोर तरुण आपल्या आई-वडिलांना घेऊन मुलीच्या घरी पोहोचला व तक्रार देऊ नका, अशी गयावया केली. पण मुलीने आपली तक्रार कायम ठेवली.
चिडीमारीच्या त्रासामुळे अनेक तरुणींचे शिक्षणाकडेही दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. म्हणूनच पालकही चिंतेत पडले आहेत. मात्र, चिडीमारीचा त्रास सहन करणाऱ्या अनेक तरुणी व त्यांचे पालक बऱ्याचदा पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यास कचरतात. त्यांना बदनामीची भीती वाटते. मात्र, चिडीमार तरुणाला धडा शिकविणाऱ्या तरुणीप्रमाणे सर्वांनी हिंमत दाखवायला हवी. शहरात कुठेही चिडीमारी आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असे आवाहन ठाणेदार संजय खंदाडे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lessons taught by the student chimimara lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.