दिग्रस वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:22 IST2020-02-11T14:16:40+5:302020-02-11T14:22:05+5:30
पुसद वन विभागांतर्गत येणाऱ्या दिग्रस वनपरिक्षेत्रातील साखरी जंगलात सोमवारी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे.

दिग्रस वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या
यवतमाळ - पुसद वन विभागांतर्गत येणाऱ्या दिग्रस वनपरिक्षेत्रातील साखरी जंगलात सोमवारी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्याची शिकार तर झाली नसावी ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
साखरी नियत क्षेत्रात कक्ष क्र. ३३८ मध्ये हा बिबट्या आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पुसद येथील सहायक वनसंरक्षक, दिग्रसचे वनपरिक्षेत्र अधिकारी, दिग्रस पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जागीच शवविच्छेदन करण्यात आले. या बिबट्याच्या मृतदेहाचे दहनही केले गेले. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात बिबट्या मृत्यू प्रकरणाची तपासणी केली जात आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.