नेर येथे अतिक्रमणधारकांना लीजपट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:33 IST2018-09-13T22:32:58+5:302018-09-13T22:33:23+5:30
शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील १२ जणांना प्रमाणपत्राचे वाटप करून करण्यात आली आहे.

नेर येथे अतिक्रमणधारकांना लीजपट्टे
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील १२ जणांना प्रमाणपत्राचे वाटप करून करण्यात आली आहे. शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लिजपट्टे वाटपाचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जाता आहे.
येथील अशोकनगरात ना. संजय राठोड यांच्या हस्ते १२ जणांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी परमानंद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष वनिता मिसळे, नगरपरिषद उपाध्यक्ष पवन जयस्वाल, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, बाबू पाटील जैत , दारव्हा उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अमोल पोवार, मुख्याधिकारी नीलेश जाधव, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे, नगरसेवक शालिक गुल्हाने, नामदेव खोब्रागडेआदी उपस्थित होते. महसूल विभागाच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ना. संजय राठोड म्हणाले, २००४ साली मी अशोकनगरवासियांना मालकी हक्काचे लिजपट्टे देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांशी चार वेळा बैठका लावून लिजपट्याचा विषय मार्गी लावला. मतदार संघाच्या विकासासाठी मी तत्पर आहे. अशेकनगरवासियांनी कराचा भरणा करून प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे.
उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. संचालन बंडू बोरकर, प्रास्ताविक नायब तहसीलदार राजेद्र चिंतकुटलावार यांनी केले. यावेळी माया राणे, रुपाली दहेलकर, वंदना मिसळे, विनोद जयसिंगपुरे, गजानन दहेलकर, रश्मी पेठकर, मजरखॉ पठाण आदिंनी उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सागर गुल्हाने, प्रमोद वासनिक, प्रशांत वगारे, धारेराव जावतकर, श्याम इंगळे, सुभाष मेश्राम आदींनी पुढाकार घेतला.