खूप शिका, मोठे स्वप्न साकार करा

By Admin | Updated: June 14, 2016 01:53 IST2016-06-14T01:53:06+5:302016-06-14T01:53:06+5:30

स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. खूप शिका आणि मोठे स्वप्न बघा. स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम घ्या, असे

Learn much, make big dreams come true | खूप शिका, मोठे स्वप्न साकार करा

खूप शिका, मोठे स्वप्न साकार करा

यवतमाळ : स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. खूप शिका आणि मोठे स्वप्न बघा. स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम घ्या, असे आत्मविश्वास निर्माण करणारे बहुमोल मार्गदर्शन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकरी पुत्रांना केले.
बळीराजा चेतना अभियान आणि भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना पुणे येथे प्रस्थान कार्यक्रम सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात घेण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, संघटनेचे राजाध्यक्ष अमर गांधी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेद्र सुराणा, विदर्भ सचिव डॉ. शेखर बंड, प्रकल्प अधिकारी विजय बुंदेला, जिल्हाध्यक्ष प्रमोद श्रीमाळ, जिल्हा सचिव हितेश सेठ, शहराध्यक्ष महेंद्र बोरा आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या बसला जिल्हाधिकारी व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी आपल्याला पुणे येथे शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून, या संधीचे सोने केले पाहिजे असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ कठोर परिश्रम कामी येते. त्यामुळे आपली परिस्थिती पालटण्यासाठी आजपासून तयारीला लागा. लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा म्हणाले, वाघोली प्रकल्पात शिक्षणासाठी जाणारी मुले देशाचे जबाबदार नागरिक घडतील. याठिकाणी विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण मिळेल. त्यातून हे विद्यार्थी आपली प्रगती साधतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले म्हणाले, आज जी व्यक्ती उच्च पदावर आपणास दिसत आहेत ते प्रतिकूल परिस्थितीशी सामना करूनच मोठे झाले आहे. पुणे इथे शिक्षणाची संधी मिळाल्याने याचा फायदा शेतकरी पुत्रांनी घेउन आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार करण्याचे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून राजाध्यक्ष अमर गांधी यांनी भारतीय जैन संघटनेतर्फे राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती दिली. गतवर्षी जिल्ह्यातील ४१ व यावर्षी ५८ विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात शिक्षणाची संधी देण्यात आली. त्यांच्या निवासाची, भोजनाची इतकेच नव्हे तर पुस्तकांची सोय संघटनेने केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन सुभाषचंद्र आचलीया यांन तर आभार महेंद्र सुराणा यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Learn much, make big dreams come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.