वळण रस्ता व सुधारणा कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:29 IST2018-09-01T23:29:00+5:302018-09-01T23:29:43+5:30
गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो.

वळण रस्ता व सुधारणा कामांचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो. त्यामुळे रस्ते आणि पूल हे नागरिकांच्या विकासाचे प्रारंभबिंदू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
हायब्रिड न्युटीअंतर्गत शहरातील वळण रस्ता व इतर रस्त्यांच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन येथील लोहारा-वाघापूर बायपास रस्त्यावर झाले. यावेळी ना.येरावार बोलत होते. यावेळी मंचावर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, नगरपरिषद बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, शिक्षण सभापती नीता केळापूरे, शासकीय कंत्राटदार जगजितसिंग ओबेराय उपस्थित होते.
यवतमाळ शहराबाहेरील १३.४६ किमीच्या वळण रस्त्याची सुधारणा करणे (कळंब चौफुली पिंपळगाव ते लोहारा) तसेच बाभूळगाव व कळंब या तालुका मुख्यालयांना जोडणाऱ्या ३४.२३ किमीच्या रस्त्यांची सुधारणा या कामांचा समावेश हायब्रिड न्युटीअंतर्गत करण्यात आला आहे. प्रास्ताविक विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश लाखानी यांनी तर, संचालन व आभार मनोज उमरतकर यांनी मानले. यावेळी नगरसेवक अमोल देशमुख, यवतमाळचे बांधकाम कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, लता ठोंबरे, करुणा तेलंग उपस्थित होते.