पाथ्रड प्रकल्पातील गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ
By Admin | Updated: May 3, 2017 00:14 IST2017-05-03T00:14:11+5:302017-05-03T00:14:11+5:30
तालुक्याच्या पाथ्रड(गोळे) धरणातून गाळ उपसण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात आला.

पाथ्रड प्रकल्पातील गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ
नागरिकांची साथ : ‘नाम’ फाऊंडेशनचे सहकार्य
नेर : तालुक्याच्या पाथ्रड(गोळे) धरणातून गाळ उपसण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात आला. ‘नाम’ फाऊंडेशनच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या धरणातून नेर शहराला पाणी पुरवठा होतो. गतवर्षी येथील नागरिकांनी श्रमदानातून या धरणाचा गाळ उपसला होता. यावेळी नाम फाऊंडेशनची दररोज सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. उर्वरित खर्चासाठी लोकवर्गणी केली जात आहे.
मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी तहसीलदार गेडाम, नाम फाऊंडेशनचे जिल्हा संयोजक नितीन पवार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील, शरद माहुरे, लाहोटी, सुरेंद्र खोडवे, पद्माकर गावंडे, संतोष अरसोड, सतीश गोळे, उमेश गोळे, पोलीस पाटील प्रफुल्ल नेरकर आदी उपस्थित होते. प्रकल्पात गाळ साचला असल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. गाळ उपसा मोहिमेसाठी सामुद्रे, शशीकांत चांदोरे, गौरव नाईकर, रवी गावंडे, वैभव बगमारे, देऊळकर, जितेंद्र गायनर, प्रणय बोबडे आदी पुढाकार घेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)