‘जेडीआयईटी’मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनाचे प्रक्षेपण
By Admin | Updated: May 30, 2014 00:26 IST2014-05-30T00:26:00+5:302014-05-30T00:26:00+5:30
अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तंत्र शिक्षण संचलनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकूल येथे ३१ मे रोजी

‘जेडीआयईटी’मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनाचे प्रक्षेपण
यवतमाळ : अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तंत्र शिक्षण संचलनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकूल येथे ३१ मे रोजी सकाळी १0 वाजता हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात पहावयास मिळणार आहे.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील ए.आर.सी. केंद्र (ई.एन.११२0) असून हा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनपर कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, महाविद्यालयाचे प्रवेश प्रमुख डॉ.संजय गुल्हाने यांनी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)