यवतमाळात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
By Admin | Updated: September 27, 2015 02:07 IST2015-09-27T02:07:02+5:302015-09-27T02:07:02+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन २५ सप्टेंबर ते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिन ११ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

यवतमाळात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
यवतमाळ : पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन २५ सप्टेंबर ते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिन ११ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. भारत सरकारच्या या उपक्रमांतर्गत यवतमाळ नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
नगरपरिषदेच्या वाहनतळातून नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मनीष दुबे, आरोग्य सभापती अरुणा गावंडे, नगरसेवक हरीश पिल्लारे, मुख्याधिकारी सुदाम धुपे आदींच्या उपस्थितीत आझाद मैदानलगतचा परिसर, इंदिरा गांधी मार्केटसमोरील रस्त्याची साफसफाई करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
अभियंता रावसाहेब पालकर, महेश जोशी, डॉ.विजय अग्रवाल, कार्यालय अधीक्षक मनोहर गुल्हाने, प्रशासन अधिकारी योगेश डाफ, पूजा जाधव, सुप्रिया रिठे, अंकिता इसळ, सचिन नालेगावकर, डी.एम. मेश्राम, अजय गहरवाल, अभियंता राजू ढोले, गजानन वातीले, सुनील शेरेकर, पुंडलिक लहूकार, अशोक मिसाळ, गणेश भुराणे, अमोल पाटील, प्रदीप बोपचे, रितेश शेळके, अनिल वानखडे, गुलाब वाघमारे, रमेश सुलभेवार, सुभेदार खान, शहेजाद, राऊत यांच्यासह कर्मचारी, कामगार आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)