अखेरचे तीन दिवस होणार कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:22+5:30
पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी मुदत वाढवून दिलीे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी ४८ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. तर कोरोनानंतरच्या काळात ४२ हजार ९१ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यानंतरही आॅनलाईन नोंदणी झालेले पाच हजार ३४० शेतकरी पणन महासंघाकडे फिरकले नाही.

अखेरचे तीन दिवस होणार कापूस खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह््यात यावर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी कापसाचे उत्पादन घेतले. शेतकऱ्यांची मागणी पाहता प्रशासनाने यावर्षी २५ जुलैपर्यंत कापूस खरेदीचा निर्णय घेतला. वाढीव कालावधीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत ९१ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा लाभ घेतला.
पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी मुदत वाढवून दिलीे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी ४८ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. तर कोरोनानंतरच्या काळात ४२ हजार ९१ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यानंतरही ऑनलाईन नोंदणी झालेले पाच हजार ३४० शेतकरी पणन महासंघाकडे फिरकले नाही.
यामुळे महासंघाने खरेदी-विक्री संघामार्फत या शेतकऱ्यांशी संपर्क साधून विचारपूस केली. त्यांचा कापूस संपला अशीच माहिती पुढे आली आहे. आता जिल्हा प्रशासनाने २५ जुलैपर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५५ लाख ६६ हजार ३५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये दहा लाख ५७ हजार ७६९ क्विंटल कापूस पणन महासंघाने खरेदी केला. २१ लाख तीन हजार ४३ क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. खासगी बाजारात दहा लाख ९८ हजार १७७ क्विंटल कापूस विक्री झाला. थेट पणन परवानाधारकांनी एक लाख ११ हजार ९०० क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीचे लायसन्स मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांनी ११ लाख ६८ हजार ४६१ क्विंटलची खरेदी केली.
चुकाऱ्याची प्रतीक्षा
कोरोना संसर्गानंतर खरेदी झालेल्या कापसाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळायचे आहे. हे चुकारे तत्काळ मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.