शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

भू-करमापकाला दहा हजारांची लाच घेताना अटक; घाटंजीत एसीबीची कारवाई

By सुरेंद्र राऊत | Updated: November 24, 2022 17:39 IST

शेतजमीन मोजण्यासाठी मागितले २० हजार

यवतमाळ : भूमिअभिलेख कार्यालयात प्रचंड अनागोंदी आहे. सर्वसामान्यांची कामे सहजासहजी केली जात नाही. घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्याने शेतजमीन मोजण्यासाठी अर्ज केला. मात्र जमीन मोजण्याकरिता भू-करमापकाने २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती त्याने दहा हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी एसीबीचे पथक सापळा लावून होते. आरोपीला रंगेहात अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी घाटंजी शहरातील नगर परिषदजवळ चहा कॅन्टीवर झाली.

रजिकोद्दीन नाजीमोद्दीन काझी (३९) असे या भू-करमापकाचे नाव आहे. तो घाटंजी तालुका उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत आहे. त्याच्यासोबत खासगी व्यक्ती रामचंद्र दशरथ किनाके (३८) रा. बोदडी याला पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्याने गावठाणापासून २०० मीटरच्या आत असलेली शेतजमीन मोजून मिळावी याकरिता अर्ज केला. शेत मोजणीचा अहवाल त्यांना तहसीलदारांकडे सादर करायचा होता. मात्र भू-करमापक काझी याने २० हजार रुपयांची लाच मागितली. ९ नोव्हेंबरपासून येरझारा मारुन शेतकरी त्रस्त झाला. शेवटी त्याने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने २३ नोव्हेंबरला तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. आरोपी व त्याच्या मदतीला असलेल्या खासगी व्यक्तीने पंचासमक्षच रोख रक्कम स्वीकारली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, सचिन भोयर, सुधीर कांबळे, अब्दूल वसीम, चालक सतीश किटकुले यांनी केली.भूमिअभिलेखमध्ये पैशासाठी अडवणूक

सर्वसामान्य नागरिकांना भूमिअभिलेख कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजण्याशिवाय पर्याय नाही. शासनाचे अधिकृत शुल्क भरूनही भूमिअखिलेख कार्यालयात जागोजागी अडवणूक केली जाते. संबंधितांना पैसे दिल्यानंतरच कागद हलतो. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणYavatmalयवतमाळArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग