भूमिअभिलेख लिपीक आणि भूमापक एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: November 25, 2014 23:02 IST2014-11-25T23:02:59+5:302014-11-25T23:02:59+5:30

येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक व भूमापकाने दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले. त्यावरून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एकास अटक

Land records clerical and groundnut ACB net | भूमिअभिलेख लिपीक आणि भूमापक एसीबीच्या जाळ्यात

भूमिअभिलेख लिपीक आणि भूमापक एसीबीच्या जाळ्यात

पांढरकवडा : येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक व भूमापकाने दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले. त्यावरून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एकास अटक करण्यात आली. दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला़
भूमापन लिपीक गुलाब भीमराव मडावी (५०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याच कार्यालयातील भूमापक गिरीधर वसंत आत्राम (३६) पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे़ या दोघांनी मोहदा येथील एका शेतकऱ्याला शेतीच्या मोजणीची शीट देण्यासाइी दोन हजार रूपयांची मागणी केली होती़ त्यावरून शेतकऱ्याने १९ नोव्हेंबरला याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. २० नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर लाचेबाबत व तक्रारीबाबत पडताळणी केली़ त्यात लाचेची मागणी व लाच निश्चित झाल्याचे सिध्द झाले. त्यावरून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रजतबंधक विभागाचे पथक येथील भूमिअभिलेख कार्यालयात धडकले. या पथकाने कार्यालयातूनच गुलाब मडावी याला अटक केली. मात्र दुसरा कर्मचारी गिरीधर आत्राम कार्यालयात आढळला नाही़ या दोघांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, नंदकुमार जामकर, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमोल महल्ले आदींनी पार पाडली. एका महिन्यापूर्वीच येथील एका महिला वनपालास एसीबीने लाच घेताना पकडले होते. आता दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्या अडकल्याने कर्मचाऱ्यांत धास्ती पसरली आहे़ (शहर प्रतिनिधी)

Web Title: Land records clerical and groundnut ACB net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.