पाच हजार एकर जमिनीचे भूमिहिनांना वाटप
By Admin | Updated: May 6, 2015 01:49 IST2015-05-06T01:49:30+5:302015-05-06T01:49:30+5:30
कर्मवीर दादासाहेब गायकवड सबळकीरण व स्वाभीमान योजनेतून यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार एकर

पाच हजार एकर जमिनीचे भूमिहिनांना वाटप
यवतमाळ : कर्मवीर दादासाहेब गायकवड सबळकीरण व स्वाभीमान योजनेतून यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असून एक हजार ३३३ भूमिहीनांना हक्काची शेती मिळाली आहे. यातून या भूमिहीनांच्या जीवनात प्रगतीची पहाट उगवणार आहे.
समाजिक न्याय विभागाकडून भूमिहीन शेतमजूरांना हक्काची जमीन देण्यासाठी २००४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवड सबळकीरण व स्वाभीमान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला १९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
यापैकी १६ कोटी १८ लाख खर्च करण्यात आले आहे. त्यातून जमीन खरेदी करण्यात आली आहे. यातून ९५ एकर ओलीताची तर चार हजार ९०६ एकर कोरडवाहू शेतजमीन भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली आहे. प्राप्त अनुदानापैकी अद्यापही दोन कोटी २१ लाखाची रक्कम अखर्चित आहे. यामध्ये २०१५-१६ यावर्षात ६० लाखाचे अनुदान मिळाले आहे. यातून आठ लाभार्थ्यांना जमीन देण्यात येणार आहे.
याशिवाय नव्याने सहा कोटींच्या जमीन वाटपाचा प्रस्ताव तयार केला आहे. यातून १९७ हेक्टर शेतजमिनीची खरेदी प्रस्तावित आहे. याच योजनेतील मुरझडी लाल व पाटापांगरा येथील ७४ एकर जमीन खरेदी प्रकरणात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे.
याशिवाय २००९-१० मध्ये सामाजिक वनीकरण विभागास २४ एकर जमीनीच्या तूकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)