जमिनीची लिलाव रक्कम अद्याप भरली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST2021-06-24T04:28:21+5:302021-06-24T04:28:21+5:30
लिलाव प्रक्रियेत १३ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. भाजपाचे जिल्हा विद्यार्थी महामंत्री विवेक जोशी यांनी ३१ लाख १४ हजार ९०० ...

जमिनीची लिलाव रक्कम अद्याप भरली नाही
लिलाव प्रक्रियेत १३ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. भाजपाचे जिल्हा विद्यार्थी महामंत्री विवेक जोशी यांनी ३१ लाख १४ हजार ९०० इतकी विक्रमी बोली लावून लिलावात बाजी मारली होती. मात्र, अद्याप रक्कम भरली नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी लिहून घेतलेल्या स्टॅम्पपेपरबाबतच संशय निर्माण झाला आहे. कारण अद्याप बीडीओंनी कुठलेही ठोस पाऊल उचललेले नाही.
बॉक्स
प्रहार तीव्र लढा उभारणार
गेल्या वर्षी विजयादशमीच्या दिवसापासून आजपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वाचविण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत लढा देत आहे. मात्र, काही प्रशासकीय अधिकारी हे राजकीय व्यक्तीच्या दावणीला बांधल्या गेल्यामुळे हा लढा आता तीव्र करावा लागेल, असे प्रहारचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी सांगितले.