विविध योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद

By Admin | Updated: October 14, 2016 03:04 IST2016-10-14T03:04:53+5:302016-10-14T03:04:53+5:30

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने विविध योजनांसाठी लाखो रूपयांची तरतूद केली आहे.

Lakhs of rupees for various schemes | विविध योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद

विविध योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद

जिल्हा परिषद : शेळी, दुभती जनावरे, पाईप, ताडपत्री देणार
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने विविध योजनांसाठी लाखो रूपयांची तरतूद केली आहे. या निधीला प्रशासकीय मंजुरी बहाल करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेळी गटाचे वाटप करणार आहे. त्यासाठी ३३ लाख ९८ हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेळी गटाचे वाटप करण्यासाठी ३४ लाख रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. विशेष घटक योजनेंअतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दुभत्या जनावरांचे वाटप करण्यासाठी ३४ लाख रूपये खर्ची घातले जाणार आहे. त्यालाही मंजुरी देण्यात आली.
अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दुभत्या जनावरांच्या पुरवठ्याकरिता ४७ लाख ६६ हजार रूपये खर्च केले जाणार आहे. त्यालाही स्थायी समितीने प्रशासकीय मान्यता दिली. आदिवासी उपयोजनेअंतर्गत दुभत्या जनावरांच्या पुरवठ्याकरिता ४९ लाख ३६ हजार रूपयांच्या खर्चासही मान्यता मिळाली. हे अनुदान अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना जनावरे खरेदीसाठी मिळेल. ‘सेस’ योजनेतून मागासवर्गीय शेतकऱ्यांना ९0 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरविण्यासाठी ४९ लाख ५0 हजार खर्च केले जाणार आहे. यात लाभार्थ्यांला १0 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे.
‘सेस’मधूनच १०० टक्के अनुदानावर मागासवर्गीय शेतकऱ्यांना ४५ लाखांचे पी. व्ही. सी. पाईप पुरविण्यात येणार आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना ३५ लाखांचे आॅईल इंजिनही पुरविले जाणार आहे. यात १00 टक्के अनुदान आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना १00 टक्के अनुदानावरच ४५ लाखांचे एच. डी. पी. ई. पाईपही पुरविले जाणार आहे. याशिवाय भजनी साहित्यासाठी ४0 लाख, जंगल भागातील शेतकऱ्यांना ताडपत्री व पी. व्ही. सी. पाईसाठी प्रत्येकी ४0 लाख, एच. डी. पी. ई. पाईपसाठी ४३ लाख रूपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lakhs of rupees for various schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.