महागाव तालुक्यातील खासगी विद्यालयात विषय शिक्षकांचा अभाव

By Admin | Updated: October 28, 2016 02:08 IST2016-10-28T02:08:13+5:302016-10-28T02:08:13+5:30

तालुक्यातील बहुतांश खासगी विद्यालयात संबंधित विषयाचे शिक्षक नसल्याने शिक्षणाचा स्तर घसरला आहे.

Lack of subject teachers in private school in Mahagaon taluka | महागाव तालुक्यातील खासगी विद्यालयात विषय शिक्षकांचा अभाव

महागाव तालुक्यातील खासगी विद्यालयात विषय शिक्षकांचा अभाव

महागाव तालुका : शिक्षणाचा स्तर घसरला
महागाव : तालुक्यातील बहुतांश खासगी विद्यालयात संबंधित विषयाचे शिक्षक नसल्याने शिक्षणाचा स्तर घसरला आहे. मात्र शाळा, महाविद्यालय चालवणाऱ्या शिक्षण संस्थानचे वार्षिक अहवाल अधिकारी मंजूर करतात. त्यामुळे कोणत्याही सुविधा नसलेल्या संस्था केवळ अनुदान लाटण्यास पात्र दिसून येत आहे.
शासन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या खासगी संस्थेची आकडेवारी कमी नाही तालुक्यात तब्बल पंचवीस संस्था आहेत. विषयाचे शिक्षक, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना स्वतंत्र शौचालय, अभ्यासक्रमाचे सिलॅबस, शाळेत पिण्याचे पाणी, भौगोलिक सुविधा असे काहीच उपलब्ध नाही. अनुदानावर संस्था येणार म्हणून सुशिक्षित बेकाराची नोकरीच्या नावाखाली फसगत केली जात आहे. फुलसावंगी येथील कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी देण्याच्या नावाखाली अमडापूर येथी तरुणाला संस्था चालकांनी लुबाडल्याचे प्रकरण अजूनही जिल्हा शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. या संस्थेचे बरेच गौडबंगाल असूनही शिक्षण विभाग संस्था चालकांना पाठीशी घालत आहे.
तालुक्यातील खासगी अनेक शाळेची स्थिती जवळपास सारखीच आहे. विषयाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान सारखे विषयातील काही ज्ञान प्राप्त झालेले नाही. परीक्षा आली की कोणी तरी शिक्षक मास कॉपी करण्यासाठी धरुन आणले जात असतात. एकच शिक्षक बरेच वेळा अनेक शाळेवरील सिलॅबस पूर्ण करून देण्यासाठी खासगी ट्युशन वर्गाचा आसरा घेताना दिसून येत आहेत. तालुक्यातील खासगी शिक्षण संस्थेचा कारभार पाहता या संस्थेला विषणाच्या शिक्षकांचे काही बंधन आहे की नाही असा प्रश्न सामान्य पालकांना पडल्याशिवाय राहत नाही.
परिणामी विषयाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान सारख्या विषयात काहीच ज्ञान दिसून येत नाही. त्याचे परिणाम परीक्षावर झालेले पहायला मिळत आहेत. या प्रकरणी कारवाई मात्र होत नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lack of subject teachers in private school in Mahagaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.