शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

ऐन निवडणुकीत वाढले मजुरांचे स्थलांतर; मतदानावर परिणाम होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:47 IST

Yavatmal : रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : २० नोव्हेंबर रोजी पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांचे दुसऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. यामुळे रिंगणातील उमेदवारांसह प्रशासनासमोर मजुरांचे स्थलांतर रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून, मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुसद तालुका हा मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने तालुक्यातील अनेक गावातील कामगार, मजुरांना आपल्या बालकांसह पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यांत व परराज्यांत कामांच्या शोधात जावे लागते. हे दुष्टचक्र सुटणार तरी कधी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दुसरीकडे या प्रकारामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली असून मतदारांना गावातच कसे थांबवून ठेवायचे याचे आव्हान आहे. पुसद तालुका म्हटले की, बहुतांश भाग हा शेतमजुरांचा ओळखला जातो. या भागातून बेरोजगार, गरीब, गरजू, मजूर, अल्पभूधारक शेतकरी व नागरिकांचे जत्थेच्या जत्थे परराज्यात व परजिल्ह्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी जातात.

पुसद तालुक्यात एमआयडीसीमध्ये नावाला एकही उद्योग सुरू नाही. तसेच येथे लघुऔद्योगिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी अनेकांनी अत्यल्प दराने लिजवर भूखंड घेऊन ठेवले आहे. मात्र या भूखंडधारकांनी एकही उद्योग सुरू केलेला नाही. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना प्लॉट उपलब्ध नसल्याने ते उद्योग सुरू शकत नाहीत. ज्यांनी या क्षेत्रातील प्लॉट अडवून ठेवले अशांवर संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. उद्योगाच्या नावाखाली अनेकजण प्लॉट बळकावून बसले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रोजगारासाठी परजिल्ह्यासह राज्यात धाव तालुक्यातील अनेक जण, छत्तीसगड, आंध्र प्रदेश किंवा राज्यातील नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी महानगरात कामे शोधायला जातात. याब- रोबरच ऊसतोडणीसाठीही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर राज्याबाहेर तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये जात असल्याने उमेदवारांनी धसका घेतला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४YavatmalयवतमाळMigrationस्थलांतरण