शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला

By Admin | Updated: June 22, 2014 00:13 IST2014-06-22T00:13:07+5:302014-06-22T00:13:07+5:30

तालुक्यातील वठोली येथे आज शनिवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास शेतीच्या वादावरून चौघांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यात मॅकलवार कुंबातील चार सदस्य गंभीर जखमी झाले.

Kurudhadi attack from farming dispute | शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला

चार गंभीर : झरी तालुक्यातील वठोली येथील घटना
झरीजामणी : तालुक्यातील वठोली येथे आज शनिवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास शेतीच्या वादावरून चौघांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यात मॅकलवार कुंबातील चार सदस्य गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्रथम झरीजामणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून यवतमाळला हलविण्यात आले आहे.
वठोली येथे विठ्ठल हनंमुतू मॅकलवार यांचे शेत आहे. त्यांच्या शेतालगत नंदकिशोर केळापुरे यांचे शेत आहे. केळापुरे यांचे शेत तेथीलच अनिल विठ्ठल दरणे यांनी मक्त्याने केले आहे. वादळामुळे विठ्ठल मॅकलवार यांच्या शेताच्या कंपाउंडचे काही खांब वाकले होते, तर काही पडले होते. हे खांब अनिल दरणे यांनी मक्त्याने केलेल्या शेताकडून होते. आज शनिवारी सकाळी रमेश विठ्ठल मॅकलवार हे शेतातील कंपाउंडचे खांब सरळ करण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी अनिल विठ्ठल दरणे, सुनील विठ्ठल दरणे आणि अरविंद विठ्ठल दरणे हे शेतात होते. या तिघांनी रमेश मॅकलवारसोबत प्रथम शाब्दीक वाद घालून शीविगाळ केली.
या वादाबाबत मॅकलवार यांच्या कुटुंबियांना माहिती मिळताच इस्तारी हनुमंतू मॅकलवार, विठ्ठल हनुमंतू मॅकलवार आणि रमेश देवन्ना मॅकलवार यांनी शेताकडे धाव घेतली. मॅकलवार कुटुंब शेतात पोहोचताच अनिल दरणे, सुनील दरणे व अरविंद दरणे या तिघांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून मॅकलवार कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात इस्तारी मॅकलवार, रमेश विठ्ठल मॅकलवार, विठ्ठल मॅकलवार व रमेश देवन्ना मॅकलवार हे चौघेही गंभीर जखमी झाले. नंतर काही ग्रामस्थांनी त्यांना तातडीने झरीजामणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर या सर्वांना यवतमाळला हलविण्यात आले.
याप्रकरणी मॅकलवार कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून अनिल दरणे, सुनील दरणे व अरविंद दरणे यांच्याविरुद्ध पाटण पोलिसांनी भांदवि ३0७, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाटणचे ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लोखंडे यांनी पाटणला भेट देऊन या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kurudhadi attack from farming dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.