गैरकारभार करणाऱ्यांवर ‘कृष्णास्त्र’
By Admin | Updated: June 8, 2017 01:15 IST2017-06-08T01:14:40+5:302017-06-08T01:15:04+5:30
महापालिका आयुक्तही रणांगणात : संशयित अडकणार चौकशीच्या फेऱ्यांत

गैरकारभार करणाऱ्यांवर ‘कृष्णास्त्र’
संजीव कुमार : उधारीचे दिवस आता संपले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत वाढले. वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस आता संपल्याने विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली करण्याबरोबरच वीज गळती कमी करण्याशिवाय आता पर्याय नाही, त्यामुळे वीज बिलांचा नियमित भरणा करणाऱ्या ग्राहकांना अखंडित सेवा देण्याबरोबरच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले. बुधवारी यवतमाळ येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली.
संजीव कुमार यांनी गळतीमुळेही महावितरणला नुकसान होत असून वाढत चाललेली वीज गळती कमी करण्याबरोबर वीज गळतीचे कारणेही शोधणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गोष्टीसाठी लाईनमनला जबाबदार न धरता स्वत: अभियंत्यांनी वीज जाळ्याचा अभ्यास करावा व वीज गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी स्पश्ट केले. ग्राहकांच्या मीटरचे वेळेत व अचूक रिडींग, वेळेत बिले देणे, यासाठी बिलिंग यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
उद्योगाला अखंडित वीज
उद्योजकांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजकांना ब्रेक डाऊन अटेंडीग व्हॅन उपलब्द करून द्यावी, तसेच प्रीव्हेंटीव्ह मेंटनन्स करावे, असे निर्देश संजीव कुमार यांनी दिले. यवतमाळ इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या.