पिढा येथे चाकूने भोसकून मुलाचा खून

By Admin | Updated: May 7, 2017 00:51 IST2017-05-07T00:51:47+5:302017-05-07T00:51:47+5:30

तुरीच्या पैशावरून झालेल्या वादात वडिलाने आपल्या मुलावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री तालुक्यातील पिढा येथे घडली.

The knife stabbed to death in the village | पिढा येथे चाकूने भोसकून मुलाचा खून

पिढा येथे चाकूने भोसकून मुलाचा खून

वडिलास अटक : तुरीच्या पैशावरून वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तुरीच्या पैशावरून झालेल्या वादात वडिलाने आपल्या मुलावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री तालुक्यातील पिढा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली आहे.
मधुकर दादाराव गाडेकर (३६) असे मृताचे नाव आहे, तर दादाराव गोविंदा गाडेकर (६६) असे आरोपी वडिलाचे नाव आहे. दादाराव गाडेकर यांच्याकडे पाच एकर ओलिताची शेती आहे. ही शेती त्यांचा मोठा मुलगा मधुकर सांभाळायचा. मधुकरने नुकत्याच तुरी विकल्या होत्या. या तुरीचा धनादेश वडिलांच्या नावावर शेती असल्याने दादारावच्या नावाने आला. बँकेत धनादेश जमा केल्यानंतर वडिलाकडे त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. परंतु वडील पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. या पैशावरून बापलेकात जोरदार वाद झाला. त्यात दादारावने मधुकरवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मधुकरच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पोलिसांनी आरोपी दादाराव गाडेकर याला अटक केली. अधिक तपास ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे करीत आहे.

Web Title: The knife stabbed to death in the village