शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

किटा जंगलात भाल्याने भोसकून केली वाघाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ बी ५१५२) याची वनविभागाच्या पथकाने झडती घेतली. त्यात आराेपींकडे वाघाची नखे, दात आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरा लगतच्या किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर  शनिवारी हे पथक यवतमाळात दाखल झाले. त्यांनी किटा-कापरा जंगलात सर्च घेतला. किटा येथील एका घरातून वाघाचे अवयव जप्त केले.रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ बी ५१५२) याची वनविभागाच्या पथकाने झडती घेतली. त्यात आराेपींकडे वाघाची नखे, दात आढळून आले. त्यानंतर वन पथकाने आराेपी प्रकाश महादेव काेळी रा. कामनदेव ता. नेर, प्रकाश रामदास राऊत रा. वरुड ता. बाभुळगाव, अंकुश बाबाराव नाईकवाडे रा. ईचाेरी ता. यवतमाळ, संदीप महादेव रंगारी रा. वर्धा, विनाेद श्यामराव मून  रा. सावळा ता. धामणगाव जि. अमरावती, विवेक सुरेश मिसाळ रा. अंजनगाव जि. अमरावती, याेगेश माणिक मिलमिले  रा. वरुड जि. अमरावती यांना अटक केली. या अराेपींनी २०१८ मध्ये उमरडा जंगलात वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. मात्र आराेपींना वन पथकाला खाेटी माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सहायक वनसंरक्षक नरेेंद्र चंदेवार व संदीप गिरी हे पथकासह यवतमाळ शहरा लगतच्या उमरडा जंगलात पाेहाेचले. तिथे त्यांना काही आढळले नाही. दिशाभूल केल्याचे लक्षात येताच वन अधिकाऱ्यांनी आराेपीला वेगळ्या शैलीत चाैकशी केली. तेव्हा त्याने खरी माहिती देत वाघाची शिकार ही हाेळीच्या दरम्यान किटा जंगलात केल्याचे सांगितले. त्यावरून  वन पथकाने किटा हे गाव गाठले तेथे घनदाट जंगलात हाडांचा सापळा आढळला. तर किटा गावातील एका घरातून हाड व एक नख जप्त करण्यात आला. तब्बल १० किलाे वजनाची हाड जप्त केली. इतर  तिघांनाही अटक केली असून त्याची सखाेल चाैकशी सुरू असल्याचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी ‘लाेकमत’ला सांगितले. 

वाघ की बिबट याबाबत साशंकता- किटा जंगलात शिकार झालेला वाघ की बिबट याबाबत स्थानिक वन अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. फाॅरेन्सिक लॅबकडून अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होईल, असे यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमर आत्राम यांनी सांगितले. हिंसक प्राणी जंगलात कशामुळे मरण पावला हे सद्यस्थितीत सांगणे कठीण आहे. याची पुढील चाैकशी नागपूर वन विभाग करीत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. - हा वाघ शिकारीचा बळी ठरला की त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्याच झाला याबाबत सध्या ठोस भूमिका वन विभागानेही घेतलेली नाही. त्यासाठी फाॅरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणात टोळी पकडण्यात आल्याने शिकारीला दुजोरा मिळत आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग