घाटंजी येथे किसान आझादी आंदोलन
By Admin | Updated: June 2, 2017 01:45 IST2017-06-02T01:45:17+5:302017-06-02T01:45:17+5:30
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यात गुरुवारपासून शेतकरी व विविध संघटनांनी संप पुकारला आहे.

घाटंजी येथे किसान आझादी आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यात गुरुवारपासून शेतकरी व विविध संघटनांनी संप पुकारला आहे. घाटंजी येथेही तहसील कार्यालयापुढे प्राऊटिस्ट व किसान आझादी आंदोलनाद्वारे उपोषण करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा, कारखानदारांप्रमाणे शेतकऱ्यांना मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार म्हणजेच शेतीला उद्योगाचा दर्जा द्या, शेतकऱ्यांच्याच मालकीचे सहकारी तत्त्वावर आधारित कारखाने सुरू करा, उत्पादन खर्च अधिक नफा आधारावर भाव लागू करा आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.
आंदोलनात मधुकर निस्ताने, मोरेश्वर वातीले, हरिभाऊ पेंदोर, गजानन राऊत, अमोल बाहेकर, मोहन पवार, निखिल कचरे, अशोक जयस्वाल, गोपाल नामपेल्लीवार, परशराम सहारे, सदाशिव मडावी, मारोती मंगाम, काशीनाथ कलाणे, चिन्नप्पा आत्राम, दिलीप मडावी, सचिन कडू, संजय गजबे, उत्तम खंडारे, गौराबाई खंडारे, रमेश गावंडे आदी सहभागी झाले होते.
नेर येथे कृषी केंद्र बंद, आज तहसीलवर मोर्चा
नेर : येथील कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने गुरुवारी बंद ठेवली. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेतमाल आणि दू शहरात आणायचे नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. आज काही प्रमाणात शेतमाल शहरात आला. मात्र शुक्रवारी शेतमाल आणि दूध शहरात येणार नाही, असे युवा संघर्ष वाहिनीचे गोपाल चव्हाण यांनी सांगितले. तसेच तुरीचे चुकारे तत्काळ मिळावे या मागणीसाठी शेतकरी शुक्रवार, २ जून रोजी तहसील कार्यालयावर धडकणार आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे सकाळी ११ वाजता मोर्चा काढला जाईल.