कीर्ती गांधी महावितरणच्या संचालकपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:20 IST2020-07-16T15:19:56+5:302020-07-16T15:20:21+5:30
काँग्रेसचे माजी आमदार कीर्ती गांधी यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

कीर्ती गांधी महावितरणच्या संचालकपदी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काँग्रेसचे माजी आमदार कीर्ती गांधी यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा व्हावा या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे.
एमएसईबी होल्डींग कंपनीने त्यांच्या नावाची शिफारस महावितरणकडे केली होती. त्यानंतर महावितरणच्या संचालक मंडळाने गांधी यांच्या नावाला मंजुरी देऊन त्यांच्या नियुक्तीची औपचारिकता पूर्ण केली. ही नियुक्ती पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे.
या निवडीसाठी कीर्ती गांधी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, बंधूतुल्य माजी खासदार विजय दर्डा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आदींना श्रेय देतात.