खंडापूरच्या परिवाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

By Admin | Updated: June 11, 2016 02:54 IST2016-06-11T02:54:14+5:302016-06-11T02:54:14+5:30

घरकुलाच्या मागणीसाठी येथील पंचायत समितीसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातील खंडापूर येथील एका परिवाराचा

Khandapur's family's self-interest efforts | खंडापूरच्या परिवाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

खंडापूरच्या परिवाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

दिग्रस प्रशासनाची सतर्कता : आंदोलन मागे
दिग्रस : घरकुलाच्या मागणीसाठी येथील पंचायत समितीसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातील खंडापूर येथील एका परिवाराचा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेने हाणून पाडला. गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर सदर कुटुंबाने आपले आंदोलन मागे घेतले.
खंडापूर येथील विलास हरीसिंग पवार यांनी वारंवार घरकुलाची मागणी केली. परंतु त्यांना घरकूल मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून १० जून रोजी सकाळी ८.३० वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. परंतु घरकूल मिळाले नाही त्यामुळे विलास आपला मुलगा केतन, मुलगी राणी आणि दमयंती यांच्यासह रॉकेलची डबकी घेऊन येथील पंचायत समितीसमोर पोहोचला. त्या ठिकाणी तत्काळ पोलीस दाखल झाले. पोलिसांनी विलासला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात प्रभारी गटविकास अधिकारी पी.आर. राठोड त्या ठिकाणी आले. विलास घेऊन ते आपल्या कक्षात गेले. त्या ठिकाणी घरकुलाबाबत चर्चा करण्यात आली. परंतु घरकुल मिळाले नाही तर आपण आत्मदहन करणारच या भूमिकेवर तो ठाम होता. गटविकास अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले. त्यानंतर विलास पवार यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पत्र लिहिले. त्यात घरकुलाचा लाभ देण्याची विनंती करण्यात आली. आता १५ दिवसात घरकूल मिळाले नाही तर पुन्हा आपण आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे याच मागणीसाठी विलास पवारने दोन वर्षापूर्वीही असाच इशारा दिला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Khandapur's family's self-interest efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.