मधुरवाणी हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:31 IST2019-01-21T22:30:42+5:302019-01-21T22:31:12+5:30
आज, बदलत्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व आवश्यक आहे. त्याला सकारात्मक विचार आणि मधूर वाणीची जोड आवश्यक असते. मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर सकारात्मक विचार आणि मधुरवाणीने सहज विजय मिळविता येतो. मी एक जिल्हा परिषद शिक्षक. माझा छोट्या-छोट्या चिमुकल्यांशी रोज संबंध येतो.

मधुरवाणी हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली!
आज, बदलत्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व आवश्यक आहे. त्याला सकारात्मक विचार आणि मधूर वाणीची जोड आवश्यक असते. मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर सकारात्मक विचार आणि मधुरवाणीने सहज विजय मिळविता येतो. मी एक जिल्हा परिषद शिक्षक. माझा छोट्या-छोट्या चिमुकल्यांशी रोज संबंध येतो. यासाठी या कौशल्याचा मला दैनंदिन जीवनात उपयोग होतो. या कौशल्याच्या बळावर अतिशय दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सावळी भागातील केळझरा (वरठी) या गावात शिक्षकाची नोकरी करताना वरील कौशल्याचा वापर करून लोकसहभागातून दोन लाख रुपये जमा करून शाळा डिजिटल व आयएसओ करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दुर्गम भागातील केळझरा(वरठी) या छोट्याशा गावाकडे वळविले हे याच कौशल्याचे फलित होय.
- आसाराम चव्हाण
जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक
राग येणे, चिडचिड यामुळे मनावर, शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यातून सामाजिक सलोखा बिघडून नकारात्मक वातावरण पसरते. त्यामुळे संक्रांतीनिमित्त का होईना ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम ‘लोकमत’ राबवित आहे. त्यात मान्यवरांच्या सकारात्मक विचारांचा सिंहाचा वाटा आहे.