देवधरीचा आदर्श सर्वांनी समोर ठेवा

By Admin | Updated: October 20, 2015 03:09 IST2015-10-20T03:09:54+5:302015-10-20T03:09:54+5:30

गावाच्या समृद्धीसाठी दारूबंदीचा महिलांनी केलेला निर्धार कौतुकास्पद आहे. पोलीस विभागाचे या चळवळीला नेहमीच

Keep the ideal of Goddhari in front of everyone | देवधरीचा आदर्श सर्वांनी समोर ठेवा

देवधरीचा आदर्श सर्वांनी समोर ठेवा

पारवा : गावाच्या समृद्धीसाठी दारूबंदीचा महिलांनी केलेला निर्धार कौतुकास्पद आहे. पोलीस विभागाचे या चळवळीला नेहमीच सहकार्य राहील. महिला आणि तरुणांनी या गावाचा आदर्श पुढे ठेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती आणि दारूबंदी महिला समिती देवधरीद्वारा आयोजित कर्तृत्ववान महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याला ते संबोधित करत होते. प्रसंगी तहसीलदार महादेवराव जोरवर, पोलीस उपनिरीक्षक तावरे, सहायक गटविकास अधिकारी गावंडे, नायब तहसीलदार विलास बोलपेल्लीवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचा सत्कार सरपंच जयाताई राऊत, उपसरपंच सुनील ढाले, दारूबंदी समितीच्या अध्यक्ष निर्मलाताई गोडे, उपाध्यक्ष वनिता पेंदोर, गीता मोहजे, बेबीताई तिजारे, कविता बावने आदींनी केला. प्रसंगी कल्पना सरवर, चंद्रकला बावने यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय ठाकरे, दिगांबरराव ठाकरे, विठ्ठलराव कडू, शालीक चवरडोल या पालकांचा सत्कार अखिलेशकुमार सिंह यांनी केला. त्यांच्या पाल्यांनी सीबीएसई शालांत परीक्षेत ९६ टक्के गुण घेत यश मिळविले आहे. या कार्यक्रमासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष दादाराव वानखडे, पोलीस पाटील राजेंद्र ठाकरे, अनंत कटकोजवार, मनोज राखे, अमोल राखे, जनार्धन पेंदोर, बच्चू सूचक, अशोक कडू, मधुकर राऊत, दिगांबर ठाकरे, रमेश गोडे, नितीन राऊत, प्रवीण कडू, जीवन कडू, सागर निकम, अमोल डाहाके, आशीष कडू, प्रवीण ठाकरे, महादेव खडसे, विजय ठाकरे, देवराव नाकाडे, प्रकाश कडू, नीलेश कडू, गंगाधर पलकंडवार, मोतीराम पेंदोर, शालीक सरवर, पांडुरंग मोजे, युवराज भगत, नामदेव गठलेवार, दिगांबरराव इरगुलवार उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Keep the ideal of Goddhari in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.