जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:17 IST2015-05-15T02:17:44+5:302015-05-15T02:17:44+5:30
येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह ..

जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन
यवतमाळ : येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह तिघांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी गुरूवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आपल्या मागणीचे निवेदन एका मोर्चाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत नेव्हल यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष ढवळे व त्यांच्या समर्थकांकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा निषेध नोंदवत जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. येथे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली.
पंचायत विस्तार अधिकारी संघटनेने जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामबंदमुळे गुरूवारी दोन्ही कार्यालयात कोणतेही कामकाज झाले नाही.
या आंदोलनाला उपमुख्याधिकारी, गटविकास अधिकारी संघटनेनेसुद्धा पाठींबा दिला आहे. मारहाण प्रकरणानंतर कर्मचारी संघटनानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. यात प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे महत्वाचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)