कळंब : सहा सरपंचांना जनतेने नाकारले

By Admin | Updated: May 1, 2015 02:03 IST2015-05-01T02:03:17+5:302015-05-01T02:03:17+5:30

नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक विद्यमान सरपंचाना जनतेने नाकारले.

Kalamb: People have rejected six Sarpanchs | कळंब : सहा सरपंचांना जनतेने नाकारले

कळंब : सहा सरपंचांना जनतेने नाकारले

कळंब : नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक विद्यमान सरपंचाना जनतेने नाकारले. तर सदस्यांना डच्चू मिळाला. नवनिर्वाचित झालेल्या बहुतांश नवख्या सदस्यांनी प्रस्थापितांना धुळ चारली. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘नवा गडी नवा राज’ यापद्धतीने गावच्या कामकाजाला सुरवात होणार आहे.
तालुक्यातील सहा विद्यमान सरपंचानी निवडणूक लढविली होती. परंतु सर्वांना पराजयाचा सामना करावा लागला. यामध्ये मावळणी येथील साधना भगत, परसोडी(बु.) येथील पुष्पा ढोले, प्रमोद देशमुख (नरसापूर), सुनंदा रायमल (निलज), रेखा भिसे (मानकापूर), कृष्णा अहीर े(मेंढला) यांचा समावेश आहे. एकूण निर्वाचित झालेल्या २२४ सदस्यांपैकी ४२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यात मिना कोरडे(आष्टी), सुप्रिया थुल (कोठा), अरुणा उईके (हिवरादरणे), मिलींद भगत, सारीका उईके, वनिता धोटे, सुवर्णा मांढरे (हुस्रापूर), महेश्वरी पाटील, राजेश शंभरकर, देवका उईके( सातेफळ), गिता कोल्हे, हेमंत कुमरे, ममता चौधरी(आलोडा), पुंडलीक मेश्राम, अर्चना वाघाडे, शांता सक्रापूरे, रंजना नागोसे (रासा), मोनिका काटकर (म्हसोला), सुधा कासार, सिता शिले (दत्तापूर), वैशाली पवार, सुष्मा इस्कापे(निलज), सुनिल कापरे, वनिता कासार, वंदना येंडे(राजुर), प्रमिला कोडापे, नंदकिशोर वाघमारे, पुष्पा मोहनापूरे, विशाल वाघ, कविता कन्नाके, रोशनी गायधने(पाथ्रड), जया उईके, वैशाली कडू, माला भाले(उमरी), वेणू मेश्राम, अनिता खोकले(नरसापूर), संगिता कदम(दोनोडा), अशोक इंगोले, दिपाली उईके, रंजना शेंडे(गंगापूर) यांचा समावेश आहे.
परसोडी(बु.) येथील निता मडावी व मेंढला येथील नीलेश नागोसे यांची ईश्वरचिट्टीने निवडीची घोषणा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kalamb: People have rejected six Sarpanchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.