ज्योत्स्ना दर्डा जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’

By Admin | Updated: June 15, 2015 02:28 IST2015-06-15T02:28:05+5:302015-06-15T02:28:05+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष व संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’ या संगीत संध्या....

Jyotsna Darda Birthday 'Memorial Color' | ज्योत्स्ना दर्डा जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’

ज्योत्स्ना दर्डा जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’

यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष व संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’ या संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार १८ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर करण्यात आले आहे.
सखींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांनी संगीत सेवेला वाहून घेतले होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संगीत सेवेचे व्रत अहोरात्र जोपासले. त्याच संगीताद्वारे त्यांना आठवण्याचा हा सोहळा होय. विदर्भाचे किशोरकुमार म्हणून नावलौकिक असलेले सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके आणि इंडियन आॅयडॉलमध्ये नागपूरचे नाव चमकविणारी गुणी गायिका यशश्री भावे-पाठक आपल्या विशिष्ट गायनाद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गीतांच्या या कार्यक्रमाला वेगळाच साज आणि आठवणींचा सुगंध लाभणार आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधी स्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर आयोजित या कार्यक्रमाचे संगीत संयोजन यवतमाळातील प्रतिथयश संगीतकार बाबा-किशोर यांच्या नटराज आॅर्केस्ट्रा करणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन अनुजा घाडगे करणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)
पाऊस आल्यास कार्यक्रम ‘मातोश्री’ सभागृहात
‘स्मृतिरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन १८ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रेरणास्थळ येथे करण्यात आले आहे. मात्र यावेळी पाऊस आल्यास हा कार्यक्रम दर्डा मातोश्री सभागृहात घेण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे.

Web Title: Jyotsna Darda Birthday 'Memorial Color'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.