बस झाडावर आदळून ११ गंभीर
By Admin | Updated: February 3, 2015 23:02 IST2015-02-03T23:02:37+5:302015-02-03T23:02:37+5:30
चालकाचे नियंत्रण गेल्याने बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात दिग्रस-दारव्हा मार्गावरील हरसूल फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

बस झाडावर आदळून ११ गंभीर
दिग्रस : चालकाचे नियंत्रण गेल्याने बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात दिग्रस-दारव्हा मार्गावरील हरसूल फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सोमासिंग पवार (४५) रा. सिंगद, युनुस गोंडील (५५), रा. दिग्रस, विजय इंगळे (१९) रा. पुसद, अ.रहेमान शे. इब्राहिम (५५) रा. चांदनगर दिग्रस, सुरज दराडे (३२) रा. परळी वैजनाथ, गणेश तंवर (३०) रा. हिवरी, अमर वरारकर (३८) रा. पालम, कोमल चव्हाण (४५), सुधाकर कांबळे रा. धुंदी, राजेश राठोड, उदल पडवाल रा. सेवानगर, असे जखमींची नावे आहे. लातूर आगाराची बस एम.एच.२० बीएल-२९५३ नागपूरहून परळीकडे जात होती.
मध्यरात्री चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस नागमोडी वळण घेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडावर आदळली. जखमींना तत्काळ दिग्रस व नंतर यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)