न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा टक्के

By Admin | Updated: June 24, 2016 02:46 IST2016-06-24T02:46:08+5:302016-06-24T02:46:08+5:30

नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे.

Just six percent of the judicial offense | न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा टक्के

न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा टक्के

संजीवकुमार सिंघल : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचा ठपका
पुसद : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे. पोलीस आणि जनता यांच्यात मैत्री भावना निर्माण करण्याची गरज असून शांततेतच सर्वांचे हित असल्याचे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी येथे केले.
पुसद शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार गजानन शेळके, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर उपस्थित होते. शहराची शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासन सक्षमपणे भूमिका वठवू शकत नाही. तसेच पोलिसांनीसुद्धा नागरिकांच्या समस्येचा, भावनेचा विचार करावा, असे आवाहन संजीवकुमार सिंघल यांनी केले.यावेळी सिंघल यांनी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एक वाहतूक नियंत्रण समिती स्थापन करून त्यामध्ये पोलीस, नगरपरिषद पदाधिकारी व इतर नागरिकांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल आदीबाबत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, जयवंतराव पाटील, शरद पाटील, ताहेरखान पठाण, सुधीर देशमुख, बिपीन चिद्दरवार, रेश्मा लोखंडे, बंडोपंत राऊत, इस्तियाकभाई, श्रीरंग सरनाईक, उत्तम डुकरे, शेख कय्यूम, अभिजित चिद्दरवार, विनायक गुजर, मुख्याध्यापक संजय रोडे, बिपीन चिद्दरवार, सुधीर देशमुख, भवरसिंह सिसोदिया, लक्ष्मण वाघमोडे, अ‍ॅड.सलिम मेमन, संघमनाथ सोमावार, शरद पाटील, उमरखेडे ठाणेदार अनिल पाटील, दिग्रसचे शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे भगवान वडतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, गजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)

Web Title: Just six percent of the judicial offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.