शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दौड स्पर्धेत अजिंक्य, रिना अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:02 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीद्वारा रविवार ४ मार्च रोजी शिवछत्रपती दौड स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देशिवजयंती उत्सव : शंभरावर स्पर्धकांचा सहभाग

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीद्वारा रविवार ४ मार्च रोजी शिवछत्रपती दौड स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या पाच किलोमीटर धावण्याच्या गटात येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी अजिंक्य गायकवाड व मुलींच्या तीन किलोमीटर गटात रिना मेश्राम यांनी अव्वल स्थान पटकाविले.यवतमाळ जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना, क्रीडा भारती, श्री शिवाजी मंडळ, शारीरिक शिक्षक संघटना यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यात १०० ते १२० स्पर्धक सहभागी झाले होते. माळीपुरा येथील शिवाजी चौकातून स्पर्धेला प्रारंभ झाला. शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, स्पर्धा संयोजक प्रा.अनंत पांडे, नगरसेविका रेखा कोठेकर, अजय म्हैसाळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत दौड स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.मुलांच्या पाच किलोमीटर गटातील निकाल याप्रमाणे. प्रथम अजिंक्य गायकवाड, द्वितीय अभिषेक नाचपेलवार, तृतीय सुरज कोमपेलवार, चतुर्थ हर्ष येंडे, पाचवा उज्ज्वल कहाते, सहावा निखिलेश बुटले, प्रोत्साहन अर्जून गावंडे. तीन किलोमीटर मुली- प्रथम रिना मेश्राम, द्वितीय अवंतिका वासनिक, तृतीय गुंजन खिची, चतुर्थ साक्षी राऊत, पाचवा संजना ढोके, सहावा इशा लढे, प्रोत्साहन वंशिका खडसे, गायत्री चांदूरकर, साक्षी मेश्राम. बक्षीस वितरण कार्यक्रमाला यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, अशोक जिरकर, अजय म्हैसाळकर, गणेश बयस, नितीन पखाले, डॉ. उल्हास नंदुरकर, मनोज येंडे, जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, सतपाल सोवळे आदी उपस्थित होते. संचालन प्रा.अनंत पांडे यांनी तर प्रास्ताविक विवेक कवठेकर यांनी केले. पंच म्हणून अविनाश जोशी, प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर, अजय मिरकुटे, संजय बट्टावार, पीयूष भुरचंडी, एम.एन. मीर, श्रीकांत राऊत, जितेंद्र सातपुते, प्रितम शहाडे, अक्षय शहाडे, अमित गुरव, व्ही.एस. रंगारी, सचिन भेंडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८