सर्वांच्या सहकार्याने काम केल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:49 IST2017-09-04T23:49:30+5:302017-09-04T23:49:52+5:30
जिल्हाधिकाºयाचे काम हे केवळ त्याचे एकट्याचे नसून ते एक टीमवर्क असते.

सर्वांच्या सहकार्याने काम केल्याचा आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकाºयाचे काम हे केवळ त्याचे एकट्याचे नसून ते एक टीमवर्क असते. यामुळेच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला. यात सर्वांचे मोलाचे योगदान आहे. शेतकºयांच्या कामाबद्दल जी संवेदनशीलता दाखविली कदाचित त्यामुळेच शासनाने कृषी आयुक्त म्हणून नेमणूक केली. तिकडे जात असलो तरी सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात चांगले काम केल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी आणि राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित निरोप समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला तर, प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, पाटबंधारे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपेल्लीवार, बांधकाम कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, उपवनसंरक्षक मुंढे, पिंगळे आदी उपस्थित होते. सचिंद्र प्रताप सिंह यांना चांदीची गणेशाची मूर्ती प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संचालन तहसीलदार सचिन शेजाळ, आभार एसडीओ स्वप्नील तांगडे यांनी मानले.