जेडीआयईटीत शुक्रवारी ‘स्फिलाटा-१७’
By Admin | Updated: March 9, 2017 00:16 IST2017-03-09T00:16:35+5:302017-03-09T00:16:35+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, १० मार्च रोजी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ‘स्फिलाटा-१७’ आयोजित करण्यात आली आहे.

जेडीआयईटीत शुक्रवारी ‘स्फिलाटा-१७’
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, १० मार्च रोजी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ‘स्फिलाटा-१७’ आयोजित करण्यात आली आहे. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर राष्ट्रीय परिसंवाद, गारमेंट, रिअल मॉडेल ड्रेपिंग व अॅसेसरिज डिझाईनिंग स्पर्धा होणार आहे. देशभरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील.
उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होईल. ११ वाजता पेपर व पोस्टर प्रेझेंटेशनसह विविध स्पर्धांच्या प्रदर्शनांचे दालन खुले केले जाईल. स्पर्धेच्या विषयावर आयोजित स्वत: डिझाईनिंग केलेल्या आणि खास बनविलेले पोषाख व पेहरावांचे प्रदर्शन केले जाईल. प्रामुख्याने गुंटुर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इंदौर, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, नागपूर, इचलकरंजी, अमरावती, वर्धा, अकोला, चिखली येथील स्पर्धक सहभागी होतील.
या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक केतन हुंडाई यवतमाळ, क्लब फॉक्स यवतमाळ, कॉलेज कट्टा यवतमाळ, शो आॅफ यवतमाळ, रेडिअँट अकॅडमी यवतमाळ, बॉडीलाईन लेडीज फिटनेस सेंटर यवतमाळ, नाईस यवतमाळ, फॅशन टेम्पल यवतमाळ हे आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
ही स्पर्धा गेली सात वर्षांपासून टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने घेतली जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आणि टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी दिली. आयोजनासाठी ‘स्फिलाटा-१७’चे समन्वयक प्रा. अजय राठोड, प्रा. संदीप सोनी, ‘टेसा’चे समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे तसेच ‘स्फिलाटा-१७’चे विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, उमेश पाटील, लोमेश नारखेडे, शुभम अवझाडे, तेजस कापसे, प्रणय ढगे, रवी कटारे, क्षितिज झळके, सागर धोटे, श्याम राठोड, शुभज जांभुळकर, युगा बोबडे, अश्विनी नैताम, वर्षा राठोड, अमित सोनकुसरे, अंकिता डेरे, हर्षल सम्रित, प्रियंका लोखंडे, नितेश धारिया, प्रणौती म्हैसकर, मृणाल डहाके, अंजली सिंगनजुळे, सुप्रिया गेडाम, रंजना साबळे, समीक्षा देवगडे, माधवी राऊत, मेहरा फाळके, अॅना सिरम, स्वप्नजा राऊत, पूनम पारधी, अश्विनी आवारे, आकाश कैकाडे आदी पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)